Home क्रीडा रावेरमध्ये जिल्हास्तरीय मॅरेथॉन उत्साहात

रावेरमध्ये जिल्हास्तरीय मॅरेथॉन उत्साहात

0
58

रावेर प्रतिनिधी । येथील अंबिका व्यायाम शाळेतर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेला अतिशय उत्स्फुर्त असा प्रतिसाद मिळाला.

तहसीलदार विजयकुमार ढगे यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. प्रमुख पाहुणे म्हणून पद्माकर महाजन, नगराध्यक्ष दारा मोहम्मद, डॉ.रवींद्र वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते. यास्पर्धेत १३३ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.

या स्पर्थेत १० किमी मुलांचा गट- विशाल कुंभार (२४ मिनिट २ सेकंद), आशिष पटेल (भोपाळ), भगतसिंग रामसिंग (मुक्ताईनगर) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. ५ किमी (४० वर्षांवरील) गट- अमित बागळे, वसंत गवंदे आणि युवराज सुशील यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. १० किमी मुलींच्या गटात अनिता भिलाला (३४ मिनिटे १८ सेकंद), वेदिका मंडलीक व सेंड्रीला डॅनिल पवार प्रथम, द्वितीय व तृतीय ठरल्या. १० किमी गटात मुलांमध्ये डांभुर्णी (ता.यावल) येथील विशाल कुंभार, तर मुलींच्या गटात शिरसाड (ता.यावल)येथील अनिता तेरसिंग भिलाला, पाच किमी गटात (४० वर्षांवरील) रावेर येथील अमित बागळे यांनी प्रथम क्रमांक मिळवला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound