रावेर, प्रतिनिधी । तालुक्यात ग्राम पंचायत निवडणुकाचे वारे वाहत असतांना इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरतांना सामाजिक बांधिलकी जोपासत महसूल विभागाकडे कोविड-१९ व ध्वजनिधीसाठी ५ लाख ९ हजार ५०० रुपयांचा निधी एका आठवड्यात जमा केला आहे.
तालुक्यातील ४८ ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळवून देश सेवा करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी देशसेवेसाठी ध्वजनिधी तर कोरोना व्हायरसच्या रुग्णासाठी कोविड निधी असा एकूण ५ लाख ९ हजार ५०० रुपयांचा निधी संकलन करून शासनाला सहकार्य केले आहे. यासाठी निवडणूक निर्णय अधिका-यांनी पुढाकार घेतल्याने त्यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे. कोविडसाठी २ लाख ८४ हजार ५०० रुपये तर ध्वजनिधीसाठी २ लाख २५ हजार असा एकूण ५ लाख ९ हाजर ५०० रुपये जमा करण्यात आले आहे.