रावेरच्या बीडीओंसह कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कोरोना रुग्णांसाठी

 

रावेर  : प्रतिनिधी ।  कोरोना बाधीतांना उपचारासाठी  सुविधा निर्माण व्हाव्या म्हणून गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल आपला व इतर कर्मचा-यांचा एक दिवसाचा वेतन ग्रामीण रुग्णालयाला वस्तु स्वरुपात देणार आहेत .

 

कोरोनाचा पादुर्भाव वाढत आहे.यामुळे पेशंटची संख्या रोज वाढत आहे.बेड व  सुविधा अपुरी पडत असल्याने. रावेर पंचयात समितीच्या गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल एक दिवसाचे वेतन देणार आहे.सोबत पंचायत समिती स्टॉप, शिक्षक, ग्राम सेवक, जिल्हा परिषद बांधकाम, जिल्हा परिषद सिंचन विभाग, महिला व बाल कल्याण विभागा यांचे देखिल कर्मचारी  एक दिवसाचे वेतन देणार आहे.

 

दरम्यान रावेर पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतीदेखिल प्रत्येकी दहा हजार रुपये तसेच जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य रोख स्वरुपात मदत करणार आहेत असे सांगण्यात आले .

Protected Content