रावेर प्रतिनिधी– येथील नगरपालिकेतर्फे आठवडे बाजार वसुलीसाठी गुरुवारी करण्यात आलेल्या लिलाव बोलीत सर्वाधिक ६ लाख १२ हजार रुपयांची बोली करण्यात आल्याने हा लिलाव करण्यात आला.
यासाठी नगरपालिकेत नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. शहरात दर शुक्रवारी आठवडे बाजार भरतो. बाजारात आलेल्या विक्रेत्यांकडून नगरपालिका कर वसूल करीत असते. कर वसुलीचा हा ठेका लिलाव करून नियमानुसार दिला जातो. आठवडे बाजार वसुलीसाठी यापूर्वी दोन वेळा लिलाव करण्यात आला होता. मात्र दोन्ही वेळी अपेक्षित बोली न लागल्याने दोन्ही लिलाव तहकूब करण्यात आलेले होते. गुरुवारी पुन्हा तिसऱ्यांदा यासाठी लिलाव करण्यात येउन सर्वाधिक ६ लाख १२ हजार रुपयांची बोली लागल्याने हा लिलाव मंजूर करण्यात आला आहे. यावेळी जवळपास सर्व नगरसेवक उपस्थित होते.