रायसोनीअन्सने साजरा केला संविधानदिनासोबत संस्थापकांचा जन्मोत्सव 

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | बी.यू.एन. रायसोनी इंग्लिश मिडीयम स्कूल, प्रेमनगर येथे शाळेचे संस्थापक कै. भाऊसाहेब उत्तमचंद नेमीचंद रायसोनी यांच्या १०८ व्या जन्मदिनामित्त शाळेमध्ये वार्षिक खेळ दिवस साजरा करण्यात आला.

यामध्ये प्रत्येक खेळा मध्ये विजेता विद्यार्थ्यांना पारितोषिक व अबॅकस मध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना शाळेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष वासुदेव चित्ते, सागर साळुंखे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

तसेच शाळेमध्ये संविधान दिवस साजरा करण्यात आला शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सामूहिक संविधान वाचन केले या दिवसाचे महत्व अश्वीनी कापसे यांनी विद्यार्थ्यांना समजविले व संविधानाचे लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जयेश कंखरे व पार्थ पोतदार या विद्यार्थ्यांनी केले. तसेच २६/११/२००८ मध्ये मुंबई मध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यात शहिद पोलिसांना , जवानांना व निष्पाप जनतेला श्रद्धांजली देण्यात आली, शाळेचे मुख्याध्यापक मनोज शिरोळे सर यांनी सर्व विद्यार्थांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी शाळेचे उपाध्यक्ष उमेद रायसोनी यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Protected Content