जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | संत बाबा हरदासराम (गोदडीवाले बाबा ) यांच्या दर्शनासाठी छत्तिसगढ राज्यातील भाविक दाखल झाले असून त्यांनी आज विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला.
रायपुर छत्तिसगढ येथील जवळपास ३०० भाविकांचा जत्था गोदडीवाले बाबा यांच्या दर्शनासाठी जळगाव शहरात दाखल झाला आहे. अमर शहीद संत कंवरराम ट्रस्टद्वारा संचलित सेवा मंडळ सिधी कॉलनी येथे संत बाबा हारदासराम आणि संत बाबा गेलाराम यांच्या दर्शनासाठी भाविक पोहोचले आहेत. त्यांचे संतांच्या हस्ते श्रीफळ व प्रसाद देवून स्वागत करण्यात आले. रायपुर येथील भाविकांनी संत बाबा हरदासराम म्हणजेच गोदडीवाले बाबा यांचे दर्शन घेतल्याने एक अलौकिक आत्मिक समाधान लाभत असल्याची भावना लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलताना व्यक्त केली. तर महिला भाविकांनी प्रवासादरम्यान गोदडीवाले बाबा यांचा कृपाशीर्वाद लाभला असून यापुढेही त्यांचा अशाच शुभाशिष लाभाव अशी प्रार्थना केली. याप्रसंगी अमर शहीद संत कंवरराम ट्रस्टच्या वतीने चेअरमन दयानंद विसराणी, अशोक मंधाण, रमेश मताणी, जगदीश कुकरेजा आदी उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/607376240524110