रायगडावरून उदयनराजेंची मोठी घोषणा!

रायगड – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे इतर काही नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे अवमान करणारे वक्तव्य केले आहे. यापार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांनी शिवाजी महाराजांचा अवमान यापुढे कुणी करूनच दाखवावा. काय होईल, ते आपल्या परीने आपण बघूनच घेऊ अशी घोषणा केली आहे.

 

भाजपाच्या नेत्यांवर  छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज रायगडावरून टीकास्त्र सोडले. राज्यपाल आणि भाजपाच्या संबंधित नेत्यांना खडेबोल सुनवले.  शिवाजी महाराजांचा आपण सन्मान करायला हवा हे बोलावं लागतं. ही बोलायची गरज आहे? ते अंतकरणातून आलं पाहिजे, अशा भावना व्यक्त केल्यात.  लवकरच एक तारीख ठरवून मुंबईतल्या आझाद मैदानात जायचंय. आजचा दिवस इतिहासात लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे. कारण आज आपण आपल्या सगळ्यांची अस्मिता असणाऱ्या शिवाजी महाराजांचा सन्मान राखण्यासाठी एक निर्धार केला आहे. आज आपण सगळे इतिहासाचा भाग झालो आहोत. कुठल्याही प्रकारे यात राजकारण येऊ देऊ नका. शिवाजी महाराजांचा अवमान यापुढे कुणी करूनच दाखवावा. काय होईल, ते आपल्या परीने आपण बघूनच घेऊ, अशी घोषणा उदयनराजे भोसलेंनी यावेळी केली.

 

Protected Content