रायगडावरील संदर्भहीन रोषणाई पाहून खासदार संभाजीराजे संतापले

 

मुंबई : वृत्तसंस्था । भारतीय पुरातत्त्व विभागाने केलेली रायगडावरील संदर्भहीन रोषणाई पाहून खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले संतापले आहेत .

 

“भारतीय पुरातत्त्व विभागाने शिवजयंती निमित्ताने रायगड किल्ल्यावर जी प्रकाशयोजना केली आहे, ती अतिशय विचित्र स्वरूपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल. त्यांचे अधिकारी महान ऐतिहासिक स्थळांच्या प्रती इतके असंवेदनशील झाले आहेत की, रंगीबेरंगी प्रकाश योजना वापरुन हे पवित्र स्मारक डिस्कोथेक सारखे दिसत आहे. एक शिवभक्त म्हणून मी मनातून दु:खी झालो असून. या प्रकारचा मी तीव्र निषेध करतो,” अशा शब्दात संभाजीराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला आहे

Protected Content