अयोध्याः वृत्तसंस्था / अयोध्येतील राम मंदिर परिसराच्या सुरक्षेबाबत उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत आयजी, एडीजी आणि सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आता मंदिर निर्माणासाठी पाया खोदण्यास सुरवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या मुद्द्यावर बैठक बोलवण्यात आली.
अयोध्येतील राम मंदिराचा संपूर्ण परिसर हा जवळच असलेल्या घरांच्या छतावरून दिसतो. यामुळे अयोध्येतील प्रशासनासाठी ही चिंता निर्माण करणारी बाब आहे. आगामी काळात अयोध्या परिसरात कोणतीही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी या भागात सुरक्षा व्यवस्था कशी असावी याविषयी प्रशासनाची चिंता आहे. राम मंदिरावर सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि भूमिपूजन याच्या आधी अनेक धमक्या आल्या आहेत. अयोध्या प्रशासन याबाबत गंभीर आहे. सुरक्षेच्या नवीन नियमांवर या बैठकीत चर्चा झाली. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी या भागात सुरक्षा यंत्रणा आणि पोलिस तैनात केले जातील.
. राम मंदिराच्या बांधकामासाठी पाया खोदण्याचे काम अयोध्येत सुरू झाले आहे. राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यावेळी उपस्थित होते.