अयोध्या (वृत्तसंस्था) मी मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या मर्यादेला बांधील आहे. मला रामजन्मभूमी ट्रस्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी निर्देश दिले आहेत, त्यामुळे मी या सोहळ्यात उपस्थित राहणार असल्याचे ट्वीट माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी केले आहे.
याआधी उमा भारती यांनी ट्विट केले होते की, जेव्हापासून अमित शाह तसेच यूपी भाजपाच्या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचे ऐकले, तेव्हापासून मी अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी चिंतित आहे. त्यामुळे मी रामजन्मभूमी ट्रस्टच्या अधिकाऱ्यांना सूचना दिली आहे की, भूमिपूजन सोहळ्यादरम्यान मी अयोध्येत शरयू नदीच्या काठावर उपस्थित असणार आहे. याचबरोबर, पंतप्रधान मोदी आणि इतर लोक गेल्यानंतर आपण रामलल्लाचे दर्शन घेऊ, असेही उमा भारती यांनी म्हटले होते. तसेच उमा भारती यांनी राम मंदिर भूमिपूजनच्या सोहळण्यातील निमंत्रितांच्या यादीतून आपले नाव हटवण्यास सांगितले होते.