Home राजकीय राम मंदिराच्या देणगीवरून विहिंप राहूल गांधींना पेचात पकडणार !

राम मंदिराच्या देणगीवरून विहिंप राहूल गांधींना पेचात पकडणार !

0
29

नवी दिल्ली । अयोध्येतील नियोजीत भव्य श्रीराम मंदिराच्या निर्मितीसाठी राहूल गांधी यांच्या कडून देखील देणगी घेण्यात येणार असल्याचे श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी जाहीर केले आहे. या माध्यमातून विश्‍व हिंदू परिषद राहूल गांधी यांना पेचात पकडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विश्‍व हिंदू परिषदेच्या क्षेत्रीय कार्यालयात पत्रकारंशी बोलताना राय म्हणाले की १५ जानेवारी २०२१ पासून सुरु होणार्‍या समर्पण अभियाना अंतर्गत विश्‍व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते देशभरातील ५ लाखांपेक्षा अधिक गावं आणि जवळपास १२ कोटी २५ लाख घरांमध्ये जातील. राहुल गांधींकडेही मदत मागायला जाणार का, असा प्रश्‍न चंपत राय यांना विचारण्यात आला. आम्ही कार्यकर्त्यांना कोणतीही विशिष्ट मर्यादा घातलेली नाही. आम्ही सर्वांकडे जाणार आणि प्रत्येकाची वेळ घेऊन जाणार, असं राय म्हणाले. यामुळे आता राहूल गांधी यांना पेचात पकडण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


Protected Content

Play sound