जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील बोरनार येथील माहेर तर रामेश्वर कॉलनीतील सासर असलेल्या विवाहितेवर चरित्र्याचा संशय घेवून २ लाख रूपयांची मागणी करणाऱ्या पतीसह चौघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, तालुक्यातील बोरनार येथील माहेर असलेल्या प्रियंका हर्षद बडगुजर (वय-२१) हिचे लग्न जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी राहणारे हर्षद युवराज बडगुजर यांच्याशी झाला. सुरूवातीचे काही दिवस चांगले गेले. त्यानंतर विवाहिता प्रियंका आणि तिची बहिण यांच्यावर चरित्र्याचा संशय घेवून वेळोवेळी नवीन व्यवसाय करण्यासाठी माहेरहून २ लाख रूपयांची मागणी केली. त्यांची ही मागणी पुर्ण न झाल्यामुळे विवाहितेसह तिच्या बहिणीला शिवीगाळ व मारहाण केली. यासाठी सासरे युवराज नथ्थू बडगुजर, सासू लता युवराज बडगुजर आणि जेठ भुषण युवराज बडगुजर यांनी पती हर्षद याला पाठींबा दिला. हा प्रकार असहाय्य झाल्याने पिडीता माहेरी निघून आल्या. विवाहितेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ बळीराम सपकाळे करीत आहे.