जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रामेश्वर कॉलनीतील मित्राच्या लग्नात नाचतांना तरूणाचा धक्का लागल्याच्या कारणावरून दोन जणांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून जखमी केल्याची घटना मंगळवार २२ मार्च रोजी रात्री ९ वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली आहे.
एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार ईश्वर सोनवणे (वय-१८) रा. जोशी वाडा, मेहरून हा आई-वडील व भाऊ यांच्यासह वास्तव्याला आहे. रामेश्वर कॉलनीतील त्याचा मित्र चेतन लाडवंजारी यांचे लग्न असल्याने २२ मार्च रोजी रात्री ९ वाजता तुषार सोनवणे हा मित्रांसोबत लग्नाच्या ठिकाणी नाचायला गेला होता. त्याठिकाणी नाचत असताना सनी उर्फ बालकीसन जाधव याला धक्का लागला. याकारणाव्यन दोघांमध्ये भांडण झाले व सनीने त्याच्या हातातील तिक्ष्ण हत्याने तुषारवर वार केले. यात तुषार गंभीर जखमी झाला. काही वेळातच सनीचा मित्र सचिन उर्फ कोंडा कैलास चव्हाण याने देखील तुषारला बेदम मारहाण केली. यावेळी उपस्थितांनी भांडण सोडवा सोडव केली व जखमी अवस्थेत तुषारला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी तुषार ईश्वर सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सनी उर्फ फौजी बालकिसन जाधव (वय-२४) आणि सचिन उर्फ कोंडा कैलास चव्हाण (वय-३०) दोन्ही रा. प्रियंका किराणा जवळ, रामेश्वर कॉलनी जळगाव यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, सनी उर्फ फौजी याच्यावर यापुर्वी वेगवेगळे सहा गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख, स.फौ. अतुल वंजारी, किशोर पाटील, मुकेश पाटील, गणेश शिरसाळे, सचिन पाटील यांनी संशयित आरोपी सनी जाधव आणि सचिन चव्हाण यांना बुधवारी २३ मार्च रोजी सकाळी अटक केली. तपासाधिकारी सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांनी दोघांन न्यायमूर्ती ए. एस. शेख यांच्या न्यायालयात हजर केले असता दोघांना २५ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारतर्फे स्वाती निकम यांनी कामकाज पाहिले.