रामदास कॉलनीतून दुचाकीची चोरी; रामानंदनगर पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील रामदास कॉलनीतील संकल्प अपार्टमेंटमधून भरदिवसा दुचाकी चोरीस गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शुक्रवार 13 नोव्हेंबर रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

रामदास कॉलनीत संकल्प अपार्टमेंट येथील प्लॅट नं 1 प्लॉट नं 2 येथे किर्तीकुमार विनोद चोरडीया (वय 50) हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. चोरडीया हे आईसक्रीमचे व्यापारी आहेत. दि. 7 नोव्हेंबर रोजी चोरडीया यांनी दुपारी 3.30 वाजता नेहमीप्रमाणे त्यांची दुचाकी (क्र. एम.एच. 19 बी.व्ही. 9540) अपार्टमेंटमध्ये भिंतीच्या कुंपनात उभी केली. यानंतर सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जाण्यासाठी निघाले असता, त्यांना त्यांची दुचाकी आढळून आली नाही. त्यांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र दुचाकी मिळून आली नाही. चोरीची खात्री झाल्यावर चोरडीया यांनी शुक्रवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन 20 हजार रुपये किंमतीची दुचाकीचोरी झाल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ललीत भदाणे हे करीत आहे.

Protected Content