मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने रामदास कदम यांच्या बंधूंना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
ईडीने आज दापोली येथील रिसॉर्ट प्रकरणात मोठी कारवाई करत रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ताब्यात घेतलं आहे. कदम यांना घेऊन ईडीचं पथक मुंबईकडे रवाना झाले असून याबाबतची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
सदानंद कदम हे रामदास कदम यांचे लहान बंधू आहे. रत्नागिरीतील खेडमधील कुडोशी येथील सदानंद कदमांच्याच अनिकेत फार्म हाऊस येथून त्यांना ईडीच्या अधिकार्यांनी ताब्यात घेतलं आहे. दापोली तालुक्यातील मुरुड येथील कथित साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीनं कारवाई केली आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यावर सातत्यानं आरोप केले होते. याच साई रिसॉर्ट प्रकरणी सोमय्यांकडून सदानंद कदमांचंही नाव जोडण्यात आलं होतं असे वृत्त एबीपी-माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे.