राधेश्याम कॉलनीतील बंद घर फोडले; एमआयडीसीत गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मोहाडी रोडवरील राधेश्याम कॉलनी येथील बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील चांदीचे शिक्के आणि ६ हजार रूपये रोख असा ८ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश पुखराज साबद्रा (वय-३१) रा. राधेश्याम कॉलनी, मोहाडी रोड हे आपल्या कुटुंबियासह राहातात. व्यापारी असल्यामुळे त्यांचे बाहेरगावी जाणे येणे असते. ३ जुलै २०२१ रोजी सकाळी ८.३० वाजता ७ जुलै सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान हे घरात कुलुप लावून व्यापारी व कामाच्या निमित्ताने बाहेरगावी गेले होते. अज्ञात चोरट्यांनी घर बंद असल्याचा फायदा घेत दिनेश साबद्रा यांचे बंद घराच्या दरवाजाचो कडी कोयंडा तोडून फेकला आणि घरात प्रवेश केला. घरातील सामानाची फेकाफेक करून लोखंडी कपाटातील सामान अस्तव्यस्त करून कपाटातील २ हजार रूपये किंमतीच्या चांदीचे शिक्के आणि ६ हजार रूपये रोख असा एकुण ८ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. दिनेश पुखराज साबद्रा यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अल्ताफ पठाण करीत आहे. 

 

Protected Content