राणे बंधूंवर गुन्हा दाखल करा : शिवसेनेची मागणी (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | राणे बंधूवर गुन्हा दाखल करा अशी मागणी जळगाव जिल्हा शिवसेना व जळगाव महानगर शिवसेनेतर्फे शहर पोलिस स्टेशनचे प्रभारी   निरीक्षक बळीराम हिरे  यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

निवेदनाचा आशय असा की, भाजपामधील पदाधिकारी निलेश राणे व नितेश राणे हे नेहमीच आमचे येथे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या बाबतीत अर्वाच्य व शिवीगाळ भाषेचा वापर करत असतात. त्यामुळे त्याच्यावर सायबर क्राईम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांचे फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्वीटर, व्हाट्सअप माध्यमे बंद करण्यात यावी. अन्यथा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा इशारा देण्यात आला आहे.

 

निवेदन देतांना शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे महानगर प्रमुख शरद तायडे युवासेना जिल्हा प्रमुख शिवराज पाटील अल्पसंख्याक आघाडी महानगर प्रमुख जाकीर पठाण महिला आघाडी महानगर प्रमुख शोभा चौधरी सरीता कोल्हे शहर प्रमुख ज्योती शिवदे सारिता माळी मनीषा पाटील विमल वाणी आशा खैरनार नगरसेवक प्रशांत नाईक अंकुश कोळी उप महानगर प्रमुख नितीन सपके गणेश गायकवाड मानसिंग सोनवणे प्रशांत सुरळकर प्रशांत फाळके शोएब खाटीक ईश्वर राजपूत पूनम राजपूत विक्की शिवदे अमोल सोनवणे संजय सांगळे समीर खाटीक इकबाल शेख जयेश बाविस्कर चंदन जाधव किरण भावसार श्रीकांत आगळे अहमद शेख आदी उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/611961963550621

 

Protected Content