नाशिक प्रतिनिधी । संजय राठोड हे विदर्भातील शिवसेनेचे आधारस्तंभ असून अलीकडे मान्यवर नेत्यांच्या विरूध्द बदनामीच्या मोहिम उघडण्यात येत आहेत. सध्या त्यांच्यावर आरोप करण्यात येत असले तरी चौकशीतून सत्य समोर येणार असल्याचे प्रतिपादन शिवसेनेच खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. त्यांनी कालच स्पष्ट शब्दात सांगितलंय की पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची योग्य चौकशी होईल. यात जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. चौकशीतून सत्य समोर येईल. मुख्यमंत्री कुणालाही पाठीशी घालणार नाही, असं रोखठोक मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मांडलं आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी चौकशीचे आदेश, मंत्री संजय राठोड यांचे नाव या प्रकरणी चर्चेत, चौकशीतून सत्य बाहेर येईल, राजकारणात एखाद्याचा बळी घ्यायचा, चारित्र्यहनन करायचे, असे प्रकार वाढलेत, राठोड अनेक वर्ष राजकारणात, राठोड विदर्भात शिवसेनेचा आधारस्तंभ आहेत, असं राऊत म्हणाले.
काल संजय राठोड यांच्या विषयी बातम्या प्रसिद्ध झाल्या. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत पण राजकारणात एखाद्या व्यक्तीचा बळी घेणं, बदनाम करणं असे प्रकार वाढलेले आहेत. असं केल्याने सरकारला त्रास होईल असं विरोधकाना वाटतं. मात्र असं काहीही होत नाही. विरोधकांनी विरोधकांचं काम करावं. लोकशाहीत ते गरजेचं आहे, असं राऊत म्हणाले.
संजय राठोड शिवसेनेचे मोठे नेते आहेत. राठोड विदर्भातील सेनेचा आधारस्तंभ आहेत. तसंच त्यांच्या समाजाचे ते सर्वोच्च नेते आहेत. विरोधी पक्षाने ठरवलं म्हणून त्या दिशेने चौकशी करायची असं होत नाही. पोलिस त्यांचं काम करत आहेत. चौकशीतून सत्य समोर येईल, असं राऊत म्हणाले.