राठोडांच्या राजीनाम्याचे वृत्त चुकीचे : संजय राऊत

 

 

मुंबई वृत्तसंस्था । वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला नसून हे वृत्त चुकीचे असल्याचा खुलासा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

 

एका  वृत्तवाहिनीने वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केल असल्याचे वृत्त दिले आहे. यानंतर याच वाहिनीशी बोलतांना शिवसेनेचे खासदार यांनी हे वृत्त खोटे असल्याचा खुलासा केला आहे.

 

याबाबत संजय राऊत म्हणाले., “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. येथे कायद्याचे राज्य आहे. प्रत्येक गोष्ट कायद्याच्या चौकटीत होइल. उच्च स्तरीय चौकशी सुरु आहे तपास एकाच चौकटीत फिरत नसतो. वेगवेगळ्या दिशेने तपास केला जातो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं लक्ष आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांचेसुद्धा लक्ष आहे. राठोड यांच्या राजीनाम्याविषयी माझ्याकडे माहिती नाही. मुख्यंमंत्र्यांकडे राजीनामा दिला असेल, तर याविषयी ते जाहीर करतील. मी त्याविषयी बोलणे बरोबर नाही. राजीनाम्याची माहिती चुकीची आहे,” असे संजय राऊत म्हणाले.

Protected Content