राज ठाकरे यांना जामीन मंजूर

 

वाशी : वृत्तसंस्था । । प्रक्षोभक भाषण केल्याच्या खटल्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज वाशी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

२०१४ साली टोल नाक्यांबाबतच्या आंदोलनात राज ठाकरे यांच्यासह इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यात राज ठाकरे यांच्यावर प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप करण्यात आला होता. तेव्हापासून आजवर या खटल्याच्या अनेकदा सुनावणी घेण्यात आल्या. मात्र राज ठाकरे एकदाही न्यायालयात हजर झाले नव्हते. यामुळे न्यायालयाने त्यांच्या विरूध्द वॉरंट बजावले होते.

या पार्श्‍वभूमिवर, आज सकाळी राज ठाकरे वाशी न्यायालयात हजर झाले असतांना त्यांना १५ हजार रूपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.

Protected Content