पुणे (वृत्तसंस्था) मनसेच्या नव्या झेंड्यात छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. संभाजी ब्रिगेडने मनसेने झेंड्यात राजमुद्रेचा वापर केल्याने विरोध दर्शवत राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. गुन्हा दाखल न झाल्यास संभाजी ब्रिगेड स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
पुणे पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोणत्याही राजकीय पक्षाने राजमुद्रेचा वापर करणे चुकीचे असून प्रांत, भाषा, जात-धर्म यावर आधारित राजकारण करणाऱ्या मनसे राज ठाकरे यांना राजमुद्रेचा वापर करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून मनसेविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही करत आहोत. गुन्हा दाखल न झाल्यास संभाजी ब्रिगेड स्टाइलने आंदोलन केले जाईल, असेही पत्रात म्हटले आहे.