Home Cities जळगाव राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सरवान १५ सप्टेंबरला जळगाव दौऱ्यावर; जिल्हा...

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सरवान १५ सप्टेंबरला जळगाव दौऱ्यावर; जिल्हा परिषदेत आढावा बैठक!

0
11


जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनु सारवान हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर महत्वपूर्ण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक मंगळवार, दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता जिल्हा परिषद कार्यालयात पार पडणार आहे.
या महत्त्वाच्या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) करिश्मा नायर यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्क आणि सेवाविषयक मागण्यांवर शासन निर्णयानुसार योग्य ती अंमलबजावणी व्हावी, यासाठी या बैठकीत विस्तृत चर्चा केली जाणार आहे.
बैठकीदरम्यान जळगाव जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये तसेच जिल्हा परिषद मुख्यालयांत कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसा हक्काच्या प्रलंबित प्रकरणांचा सविस्तर आढावा घेतला जाईल. याशिवाय जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांची एकूण मंजूर पदे, प्रत्यक्षात भरलेली पदे आणि सध्या रिक्त असलेल्या पदांची अधिकृत माहिती तपासून पुढील कारवाईची दिशा ठरवली जाणार आहे.
सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या, कामाच्या ठिकाणच्या अडचणी आणि सेवाविषयक हक्कांवर थेट चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.


Protected Content

Play sound