एरंडोल, प्रतिनिधी । येथील पंचायत समिती कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेतर्फे शासन परिपत्रकाची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला.
१४ जानेवारी २०२१ चा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करणे, सर्व संगणक परीचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे, आपले सरकार प्रकल्पात ३९२ कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या सीएससी-एसपीव्ही कंपनीवर कारवाई करावी आदी मागण्यासाठी पंचायत समिती येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी १४ जानेवारी २०२१ चा अन्यायकारक शासन निर्णयाची होळी करण्यात आली. याप्रसंगी तालुकाध्यक्ष रामचंद्र पाटील, उपाध्यक्ष संतोष पाटील, सचिव चेतन सोनवणे, महेंद्र पाटील, राजश्री धर्माधिकारी, विजेंद्र चौधरी, मनीषा पाटील, प्रीती कुलकर्णी, उमेश राठोड, प्रवीण कोळी, नवल चव्हाण, सचिन सोनवणे, सचिन निकम, पंकज चौधरी, विनोद सोनवणे, किशोर चौधरी, जगदीश पाटील, गजानन राजपूत, दिनेश पाटील, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/418835909234623