राज्यात ९ हजार ६१५ नवे कोरोना रुग्ण ; २७८ जणांचा मृत्यू

मुंबई (वृत्तसंस्था) शुक्रवारी राज्यात ९ हजार ६१५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर २७८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय आज ५ हजार ७१४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे या रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे.

 

महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३ लाख ५७ हजार ११७ वर पोहोचली आहे. आतापर्यंत १ लाख ९९ हजार ९६७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत १३ हजार १३२ जणांची कोरोना विरुद्धची झुंज अपयशस्वी ठरली आहे.  मराठवाड्यात शुक्रवारी एकूण ६३७ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून दहा बाधितांचा मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून ३२४ नवे रुग्ण आढळले तर ६ मृत्यूंची नोंद झाली. लातूर जिल्ह्यात नवीन ७६ रुग्ण सापडले. नांदेड जिल्ह्यात ३९ रुग्णांची वाढ होऊन एकाचा मृत्यू झाला. तर जालना जिल्ह्यात तब्बल ११७ नवे रुग्ण आढळले आहेत. हिंगोलीत २४ नवे रुग्ण आणि एक बळी, परभणीत २३ नवीन रुग्ण आणि दोन बळी तर बीडमध्ये १६ रुग्णांची वाढ झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातही १८ नवीन रुग्ण आढळून आले.

Protected Content