मुंबई प्रतिनिधी । केंद्र सरकारने काल रात्री काही दुकाने सुरू करण्यासाठी सशर्त परवानगी दिली असली तरी राज्य सरकारने मात्र याच्या विपरीत ३ मे पर्यंत कोणतीही दुकाने खुली करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज याबाबत घोषणा केली.
केंद्र सरकारने काल रात्री उशिरा काही निर्देश दिले आहेत. यानुसार काही दुकानांना सशर्त परवानगी देण्यात आलेली आहे. यानुसार काही दुकानांना सशर्त परवानगी देण्यात आलेली आहे. तथापि, राज्य सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली. जोपर्यंत राज्य शासन यामध्ये निर्णय घेत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात असलेली दुकानं सुरु करण्याचा काही प्रश्नच येत नाही. काल रात्री केंद्राने काही निर्णय घेतले आहेत. मात्र अद्याप राज्य सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले. यामुळे केंद्र सरकारच्या निर्देशानंतर सुरू झालेला संशयकल्लोळ बर्याच प्रमाणात मिटण्याची शक्यता आहे.
दरम्यान, लॉकडाउन हा कदाचित ३ मेपर्यंत सुरू राहणार असला तरी याला अजून वाढविण्याची शक्यता असल्याचे संकेत देखील राजेश टोपे यांनी दिली. तर, महाराष्ट्रात समूह संसर्ग नाही, तसंच अद्याप आपण तिसर्या स्टेजलाही गेलो नसल्याची माहिती त्यांनी दिली.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००