राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । महापुरानंतर काही काळ विश्रांती घेतलेला पाऊस राज्यात पुन्हा सक्रिय होणार आहे.

 

मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.  भारतीय हवामान विभागाच्या मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही तासांमध्ये राज्याच्या कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्यात विदर्भासह अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

 

हवामान खात्याने १५ ते १९ ऑगस्ट दरम्यान पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात सर्वदूर पाऊस होणार अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. तर कोकणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि यावेळी विदर्भ आणि मराठवाडामध्ये चांगला पाऊस होईल असा हवामान खात्याने म्हटले आहे.

 

 

 

हवामान विभागाकडून बहुतांश जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, पुणे जिल्ह्यातील घाट प्रदेश, सोलापूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणामध्ये मुसरळधार पावसाची शक्यता आहे. येत्या ३ ते ४ दिवसांमध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये अति मुसरळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

सोलापूर, सांगली, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांना यलो  अलर्ट देण्यात आला आहे

Protected Content