नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात लवकरच मध्यावधी निवडणूक होणार असल्याचे सूतोवाच आज संजय राऊत यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलतांना केले.
आज मीडियाशी बोलतांना संजय राऊत म्हणाले की, मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचे संकेत महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी दिले आहेत. मात्र खुद्द भाजपचे मंत्री रावसाहेब दानवे यांनीही राज्यातील स्थिती गोंधळलेली असल्याचं म्हटलं. त्यामुळे रावसाहेब दानवे कधी कधी खरंही बोलून जातात. हे मध्यावधीचे संकेत समजावेत. शिंदे-भाजप सरकार १०० टक्के पडणार असा दावा संजय राऊत यांनी याप्रसंगी केला.
रावसाहेब दानवे कधी कधी खरं बोलून दाखवतात. दोन महिन्यानंतर काहीही होऊ शकतं. म्हणजे सरकार पडू शकतं म्हणजेच त्यांनी मध्यवधीचे संकेत दिले आहेत. हे सरकार १०० टक्के पडतंय, याविषयी माझ्याकडे पूर्ण माहिती आणि खात्री आहे, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. दरम्यान, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिला, तरुणाई या यात्रेकडे आशेने पाहत आहे. सध्या यात्रा गुजरातला आहे. माझीही यात्रेत सहभागी होण्याची इच्छा आहे. पक्षप्रमुखांशी परवानगी घेऊन लवकरच या यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती देखील राऊत यांनी दिली.