मुंबई वृत्तसंस्था । राज्यात गुरूवारी दिवसभरात ३ हजार ७५२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख २० हजार ५०४ वर पोहोचली आहे. राज्यात आज दिवसभरात १ हजार ६७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात सध्या ५३ हजार ९०१ रुग्णांवर उपचार सुरु आहे. दरम्यान, राज्यात आज दिवसभरात १०० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये ६६ पुरुष तर ३४ महिला रुग्णांचा समावेश आहे. राज्यात आज नोंद झालेल्या १०० मृत्यूपैकी ६0 वर्षे किंवा त्यावरील ४५ रुग्ण आहेत, तर ४६ रुग्ण हे वयवर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. याशिवाय ९ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. राज्यात आतापर्यंत ५ हजार ७५१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.