राज्यात आता अनाथांना १ टक्का आरक्षण

 

मुंबई : वृत्तसंस्था । राज्यात आता अनाथांना 1 टक्का आरक्षणाचाही निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विटरद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

 

नोंदणी व मुद्रांक विभागातील दुय्यम निबंधक (श्रेणी-1) आणि मुद्रांक निरीक्षक गट ब (अराजपत्रित) ही पदे लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणण्यात आली आहेत   अमरावती जिल्ह्यातील राजूरा लघू पाठबंधारे प्रकल्पास 193.81 कोटींची सुधारित मान्यता देण्यात आली आहे   नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह ही केंद्र पुरस्कृत सुधारित योजना राज्यात राबवली जाणार आहे  भारताच्या स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव राज्यात 15 ऑगस्ट 2023 पर्यंत साजरा केला जाणार आहे हे निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले .

 

Protected Content