मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात केवळ आठवडाभर पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.
कोरोनाचा वाढलेल्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी राज्यातील रक्त पुरवठा, पीपीई कीट, मास्क आदींची उपलब्धता जाणून घेण्यासाठी रक्त पेढी व पीपीई कीट्स-मास्क उत्पादकांबरोबर बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी राज्यातील रक्त तुटवड्याबाबत माहिती देत रक्तदानाचे आवाहन केले. केवळ करोनाबाधितांवरील उपचारांसाठीच नाही, तर बाळांतपण, विविध शस्त्रक्रिया, कर्करोग, थॅलसेमिया अशा आजारांवरील उपाचारांमध्ये देखील रक्ताची मोठी आवश्यकता असते, त्यामुळे आपल्या जवळच्या रक्तपेढीत, रुग्णालयात किंवा सोसायटीमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करून रक्तदान करावे, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.