मुंबई : वृत्तसंस्था । राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन खात्याच्या बैठकीत घेण्यात आला.
मदत व पुनर्वसन खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भातील घोषणा केली. या बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सचिव, पुनर्वसन खात्याचे सदस्य उपस्थित होते. कोरोनाची सद्यस्थिती पाहून आम्ही आमच्या अधिकारात हा परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेऊन तसे शासनास कळवले, असे वडेट्टीवार म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आणि नंतर राज्यात ज्यांचा परीक्षा रद्द च्या निर्णयाला विरोध होता, त्यांचाही विरोध मावळला. तत्पूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या परीक्षा रद्द करण्याबाबतची आपली भूमिका जाहीर केली होती. मात्र औपचारिकपणे प्रस्ताव मदत व पुनर्वसन खात्याकडे पाठवून या प्रस्तावास मंजुरी देत राज्य सरकारने आणि मदत व पुनर्वसन खात्याने हा निर्णय घेतला, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.