जळगाव प्रतिनिधी । राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा सोमवारी २० डिसेंबर रोजी जळगाव जिल्हा दौरा असून चोपडा व जळगाव शहरात विविध कार्यक्रमांना उपस्थिती देणार आहे. अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.
सविस्तर माहिती अशी की, राज्याचे गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांचा सोमवारी २० डिसेंबर रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे. सुरूवातीला सकाळी ८.५० जळगाव विमानतळावर आगमन होणार असून तेथून थेट चोपडा येथील नगरपरिषद येथे सकाळी १० वाजता महाराष्ट्र सुवर्ण जयंती नागरोत्थान महाअभियानांतर्गत पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. दुपारी १२ ते १ चोपडा येथे काँग्रेस कार्यकर्ता मोळाव्याला उपस्थिती देणार आहे. दुपारी २ वाजता चोपडा तालुका सहकारी सुतगिरणीचे जिनींग व प्रेसिंग प्रकल्पाने भूमीपूजन समारंभ होणार आहे.
दुपारी ३.१५ ते ४.१५ दरम्यान जळगाव येथील पोलीस मुख्यालयाच्या आवारात पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या शासकीय निवासस्थानांच्या नवीन इमारतीचे उद्घाटना गुहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. शिवाय ४ ते ५.३० दरम्यान पोलीस अधिक्षक कार्यालयात नाशिक परिक्षेत्रांतर्गत कायदा व सुव्यवस्था तसेच इतर विषयांच्या अनुषंगाने विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांच्यासोबत बैठकीत उपस्थित राहणर आहे. सायंकाळी ५.३० ते ६.३० शासकीय अजिंठा विश्रामगृह येथे राखीव असून सायंकाळी ७ वाजता जळगाव विमानतळावरून विमानाने मुंबईकडे रवाना होणार आहे.