राज्यस्तरीय लोकगीत जागर स्पर्धेत शाहीर शिवाजीराव पाटील व विनोद ढगे यांची निवड

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाच्या मुख्य निवडणूक आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय लोकगीत जागर स्पर्धेत शाहीर शिवाजी राव पाटील आणि शाहीर विनोद ढगे यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती शाहीर विनोद ढगे यांनी नगराज हॉल येथे मंगळवारी १० जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली.

लोकशाहीतून लोकगीतांचा जागर या समूह गीत गायन स्पर्धेमध्ये खानदेशातील पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील लोकरंग फाउंडेशनचे अध्यक्ष शाहीर शिवाजीराव पाटील यांचा मराठी गीताचा दुसरा क्रमांक आला तर खानदेश लोक कलावंत विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष शाहीर विनोद ढगे यांना तृतीय क्रमांकाचा सन्मान मिळालेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या मुख्य निवडणूक आयोगातर्फे राज्यभरात मतदारांमध्ये जी उदासीनता दिसून येते ती उदासीनता दूर व्हावी या उद्देशाने राज्य निवडणूक आयोगाने सन 2022 मध्ये लोक कलावंतांना लोकगीतातून लोकशाहीचा जागर हा विषय दिलेला होता. निवड झालेल्या शाहीरांना महाराष्ट्र शासनाच्या निवडणूक आयोगातर्फे येत्या २५ जानेवारी रोजी मुंबई येथे राज्य निवडणूक आयुक्त यांच्याहस्ते दोन्ही शाहीरांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती शाहीर विनोद ढगे यांनी नगराज हॉल येथे मंगळवारी १० जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली.

Protected Content