Home आरोग्य राज्यभरात ३६१ पोलीसांना कोरोनाची लागण

राज्यभरात ३६१ पोलीसांना कोरोनाची लागण


मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईसह महाराष्ट्रात तब्बल ३६१ पोलीस कोरोनाबाधित असल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात ३६१ पोलिसांना कोरोना झाला आहे. आज रोजी जवळपास १९ पोलिसांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाबाधित पोलिसांची संख्या ३४२ वरुन ३६१ वर गेली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील कोरोनाबाधित पोलिसांपैकी ४९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. उर्वरित ३०९ पोलिसांवर उपचार सुरु असून आतापर्यंत ३ पोलिसांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.


Protected Content

Play sound