राजू सूर्यवंशी, अनंता सूर्यवंशीला १६ पर्यत पोलीस कोठडी !

 

भुसावळ : प्रतिनिधी । राजू सूर्यवंशी,  अनंता सूर्यवंशी या दोन आरोपींना   १६ मार्चपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश भुसावळ न्यालयाने दिले आहेत

 

वरणगांव पोलीस स्टेशनमध्ये संजय  खन्ना यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजू सूर्यवंशी व अनंता सूर्यवंशी यांच्याविरुद्ध ९ मार्चरोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.  उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे व सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चाँडक यांच्या मार्गदर्शनाखाली १२ मार्चरोजी मध्यरात्री कोंबिग ऑपरेशनासाठी चार पथकांची नेमणूक करून मध्यरात्री राजू सूर्यवंशीला त्याच्या  राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले होते .  अनंता सूर्यवंशीला  सकाळी वरणगांव पोलिसांनी ताब्यात घेवून सपोनि संदीपकुमार बोरसे यांनी आरोपींना भुसावळ न्यायालयात हजर केले होते न्यायालयाने त्यांना १६ तारखे पर्यत पोलीस कोठडी सूनावली आहे.

 

न्या . आर. एस. मानकर  यांच्यासमोर राजू सुर्यवंशी यांची बाजू  .अँड. जगदीश कापडे यांनी  व  अनंता सूर्यवंशी यांनी बाजू अँड. मतीन अहमद यांनी मांडली.

Protected Content