फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील ख्यातनाम कलावंत राजू साळी यांनी आपल्या कुंचल्यातून विठ्ठलाच्या रूपात दत्त भगवानाची प्रतिमा साकारली आहे.
पंढरपूरचे विठोबा मंदिर हे कोट्यावधी हिंदू भारतीयांचे तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. वारकरी संप्रदायाचे प्रमुख मानले जात असून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात प्रामुख्याने विठ्ठलाचे पूजन केले जाते. विठ्ठल, विठोबा, पांडुरंग या नावाने परिचित असून भगवान विष्णु व कृष्णाचे रूप मानले जाते.
आषाढी एकादशीचे औचित्य साधून श्री. एस.बी.चौधरी हायस्कूल चांगदेव येथील कलाशिक्षक, चित्रकार राजू साळी यांनी आपल्या कल्पकतेने अतिवास्तववादी विठ्ठलाची पेंटिंग साकारलेली असून सदर पेंटिंग मध्ये संत तुकाराम,व ज्ञानेश्वर यांची प्रतिमा दत्त भगवानच्या रूपात दाखवण्यात आलेले आहेत. तसेच विठ्ठलाच्या चरणी वारकर्यांची मांदियाळी दिसत आहे.पैंटिंग बघितल्यावर मन प्रसन्न होते. पेंटिंग बघितल्यावर साक्षात दत्त भगवान आपल्या समोर उभे आहेत असा भास निर्माण होतो. साळी हे दरवर्षी विठ्ठलाच्या जीवनावर आधारित नवनवीन पेंटिंग तयार करीत असतात.विठ्ठलाच्या पेंटिंगने जणू त्यांना स्फूर्ती व प्रेरणा मिळत असते. त्यांच्या पेन्टिंगचे खूप कौतुक होत आहेत.