जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ना. गुलाबराव पाटील यांनी वंदन केल्यानंतर महापुरूषांच्या पुतळ्याचे कथित शुध्दीकरण करून गुलाबराव वाघ आणि त्यांच्या सहकार्यांनी त्यांची विटंबना केली आहे. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आज जनक्रांती मोर्चातर्फे करण्यात आली. तसेच याप्रसंगी इंद्र मेघवाल या विद्यार्थ्याचा खून करणार्या शिक्षकाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी देखील करण्यात आली.
राजस्थान राज्यातील जालोर येथील दलित अल्पवयीन विद्यार्थ्याला द्वेषापोटी अमानुष मारहाण करून हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.
राजस्थानमधील जालोर येथील एका ९ वर्षाच्या इंद्रकुमार मेघवाल या दलीत विद्यार्थ्याने पाणी पिण्यासाठी शाळेच्या भांड्याला हात लावला. तेव्हा शाळेतील शिक्षकाने त्याला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत त्याच्या कानाची नस फुटली. यानंतर त्याला उपचारासाठी उदयपूरला पाठवण्यात आले आणि नंतर उदयपूरहून अहमदाबादला पाठवण्यात आले होते. मात्र अहमदाबादमध्ये उपचारादरम्यान विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. पिण्याच्या पाण्यासाठी एका दलीत विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला. ही घटना मानवतेला काळीमा फासवणारी आहे. मारहाण करणाऱ्या शिक्षकाला फाशीची शिक्षा करावी अशी मागणी आंदोलकांनी करून निवेदन जिल्हाधिकारी देण्यात आले आहे.
या निवेदनावर महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे, मुकुंद नन्नवरे, रमेश सोनवणे, संजय सपकाळे, विक्की जावळे, चंदन बिऱ्हाडे, हरिचंद्र सोनवणे, प्रा. प्रितीलाल पवार, बाबुराव वाघ, महेंद्र केदारे, दिलीप सपकाळे, ॲड. राजेश गोयर, युवराज सुरवाडे, संदीप ढंढोरे, सुरेश तायउे, साहेबराव वानखेडे, नितीन मोरे, जयपाल धुरंधर, दिलीप सपकाळे, उमेश गाढे, आनंदा तायडे, गौतम सपकाळे, चंद्रकांत नन्नवरे, यशवंत घोडेस्वार, वाल्मिक सपकाळे, मोहन शिंदे यांच्यासह आदी उपस्थित होते.