जळगाव प्रतिनिधी । शहरातील राजश्री शाहू महाराज हॉस्पिटलमध्ये प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी रोजी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबीरात १५० हून अधिक रूग्णांनी मोफत तपासणी शिबीराचा लाभ घेतला, अशी माहिती राजश्री शाहु महाराज हॉस्पिटलचे अध्यक्ष श्री. प्रकाशजी चौबे यांनी दिली.
प्रजासत्ताक दिनाचे निमित्त साधून २६ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेच्या दरम्यान शहरातील राजश्री शाहू महाराज हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून गरजू व गरीब रूग्णांसाठीच्या मोफत आरोग्य तपासणी शिबीरात रूग्णांचे निदान व उपचार करण्यात आले होते. यात ब्लड प्रेशर, डायबिटीज, थायरॉईड, जनरल आजार, हृयासंबंधी आजार, नाक, कान, घसा याचे आजार, मुळव्याध, हार्निया, आतड्याचे विकार, पोटांचे विकार, छातीच्या गाठी यांच्यासह आदी आजारांची तपासणी व निदान केले. आयोजित शिबीरात १५० हून अधिक गरजू रूग्णांची तपासणी करण्यात आली. शिबीर यशस्वितेसाठी राजश्री शाहू महाराज हॉस्पिटलचे व्यवस्थापक संतोष नवगाळे, डॉ. निलेश महाजन, डॉ. तेजस राणे, डॉ. विजय चौधरी, डॉ. प्रशांत चोपडा यांच्यासह हॉस्पिटलचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.