राजर्षी शाहू महाराज यांच्या १०० व्या स्मृतीशताब्दीनिमित्ताने आदरांजली (व्हिडिओ)

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | लोकराजे, छत्रपती, राजर्षी शाहू महाराज यांच्या १०० व्या स्मृतीशताब्दी निमित्ताने सामाजिकशास्त्रे प्रशाळा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात  स्मार्ट क्लासरूम येथे अभिवादन करण्यात आले.

 

सामाजिक शास्त्रे प्रशाळेचे प्रभारी संचालक मा.प्रा.डॉ.अजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकराजे, राजर्षी शाहू महाराज यांच्या १०० व्या स्मृतीशताब्दीनिमित्ताने आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेलामा संचालक प्रा. डॉ. अजय पाटील यांच्या हस्तेपुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. अजय पाटील म्हणाले की, लोकराजे, छत्रपती शाहू महाराज हे क्रांतिकारक ,कल्याणकारी राजे होते त्यांनी समाजातील उपेक्षित,वंचित घटकांना आर्थिक व समाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आपल्या राज्यात अनेक कल्याणकारी कायदे केले आणि त्याद्वारे समाजात शिक्षणप्रसार, महिलांना सन्मान अधिकार, राज्यात ५० टक्के आरक्षण लागू करून राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक क्रांतीला अधिक गतिमान केले. आजही शाहू महाराज यांचे विचार प्रासंगिक असून आवश्यक आहेत.विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांनी हे विचार आत्मसात करणे हिच खरी शाहू महाराजांना आदरांजली ठरेल. कार्यक्रमाच्या शेवटी राजर्षी शाहू महाराज यांच्या १०० व्या स्मृतिशताब्दी निमित्ताने या लोकराज्याला १०० सेकंद स्तब्ध उभे राहून आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागाचे डॉ. विजय घोरपडे यांनी केले तर आभार समाजकार्य विभागाचे डॉ. दीपक सोनवणे यांनी मानले. यावेळी राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. उमेश गोगडीया, संजय सपकाळे, डॉ. प्रशांत सोनावणे, डॉ. जगतराव धनगर, डॉ. मनोज इंगोले, हर्षल पाटील, डॉ. विश्रांती ,प्रा.वर्षा पालखे, डॉ.अर्चना पाटील, प्रा. निता पाटील, प्रा. विनोद नाइक, प्रा. दिनेश हालोर, हर्षल साळुंके, डॉ. विना महाजन, लोकेश तायडे, अजय सपकाळे, कुणाल महाजन , राहुल चौधरी, पौर्णिमा देशमुख, प्रदीप चव्हाण, पुरुषोत्तम पाटील, विश्वास वळवी, योगेश्वर पाटील, विजय कोळी, विक्की साळवे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/411635853797653

 

Protected Content