जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील जगतगुरु संत रोहीदास महाराज चर्मकार बहुद्देशीय संस्था, जळगावतर्फे रविवारी ५ फेब्रुवारी रोजी संत रोहिदास महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या मूर्तीची राजमालती नगर येथे प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आ. सुरेश भोळे, माजी पोलीस निरीक्षक मगन मेहेते, समाजसेवक दीपक माने, संस्थेचे अध्यक्ष किशोर धोरे, उपाध्यक्ष विजय खजूरे, सचिव दीपक मेथे, खजिनदार विजय अहिरे यांची उपस्थिती होती. सुरुवातीला संत रोहिदास महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. आ. भोळे यांनी मूर्तीचे पूजन करीत माल्यार्पण करून अभिवादन केले.
प्रसंगी आ. राजूमामा भोळे म्हणाले की, महापुरुषांनी समाजासाठी मोठे योगदान दिले आहे. संत रोहिदास महाराज यांच्या विचारांची परंपरा समाजबांधवानी पुढे नेली पाहिजे. राजमालती नगर येथील संत रोहिदास महाराज यांचा पुतळा ऐतिहासिक असेल, असेही आ. भोळे म्हणाले. मगन मेहेते यांनी, संत रोहिदास महाराजांच्या कार्याविषयी माहिती देऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी कार्यरत राहिले पाहिजे असे सांगितले.
जळगावात संत रोहिदास महाराज यांची प्राणप्रतिष्ठा झाल्याबद्दल मान्यवरांकडून संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुंबई येथील गुरु रविदास वधुवर मेळाव्याचे शंकर अहिरे, प्रबोधनकार परशुराम अहिरे, ठाणे येथील आयकर विभागाचे दीपक पवार, धुळे येथील माधव ठाकरे, शिरपूरचे अशोक महात्मे उपस्थित होते.
कार्यक्रमाला नालंदा बौद्ध विहारासह शिंपी समाजाचे प्रेमराज शिंपी, गोविंदा शिंपी यांचे सहकार्य लाभले. यावेळी सदस्य महेंद्र मेथे, लखन जिरे, साहेबराव खजुरे,गजानन ठाकरे, दिलीप धोरे, कैलास मेथे, छोटू धोरे, भाईदास कासवे, गणेश धोरे, छोटू सुरवाडे, राजू मोतीराळे, सुनील विसावे, दीपक धोरे, किशोर हिरे, पंडित धोरे, संतोष धोरे, सुनील वाघ, परमेश्वर अहिरे, गुलाब महाले, कैलास सावकारे आदींनी परिश्रम घेतले.