सिंदखेडराजा प्रतिनिधी । राजमाता जिजाऊ माँ साहेबांच्या ४२१ व्या जयंती जन्मोत्सवानिमित्त येथे उद्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आज राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यावर जिजाऊ जन्म स्थळी भव्य मशाल यात्रा काढून मानवंदना देण्यात आली. या यात्रेत जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघाच्या महिला व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वेळी हलगीच्या निनादासह जय जिजाऊ जय शिवरायच्या घोषणा देण्यात आल्या. ही मशाल यात्रा जन्मस्थळावरून निघून ढोल ताशांच्या गजरात नगर प्रदक्षिणा करण्यात आली व नंतर मशाल यात्रेचा समारोप जिजाऊ सृष्टी येथे करण्यात आला. या यात्रेत जिजाऊ ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा डॉ. रेखा पाटील चव्हाण, सचिव पूनम पारसकर, कार्याध्यक्ष माधुरी भदाने, वनिता अरबट, वनिता गायकवाड, वनिता कोल्हे, संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष पंकज जायले, योगेश पाटील, जिल्हाध्यक्ष ज्योतीताई जाधव, रामेश्वर ढगे, बाळू जाधव, डॉ. अर्चना ठोसरे, सविता पंजाब खांडेभराड, जिजाऊ जन्मोत्सव समितीचे सचिव सुभाष कोल्हे, मराठा सेवा संघाच्या कार्यकर्ते तसेच महिलांनी सहभाग नोंदवला.