चाळीसगाव, प्रतिनिधी | आजच्या आधुनिक युगात राजमाता जिजाऊ घडल्या तरच शिवबा घडतील, असे प्रतिपादन संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य योगेश पाटील यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलतांना सांगितले. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्ताने योगेश पाटील बोलत होते.
देशात दरवर्षी १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा सावटाखाली व नियमांचे पालन करून जयंती साजरी करण्यात येत आहे. आज १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांची जयंती असल्याने संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य योगेश राजधर पाटील यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी संवाद साधला. यावेळी राजमाता जिजाऊ घडल्या तरच शिवबा घडतील असे प्रतिपादन करून स्त्रीभ्रुण हत्या व बालविवाह बंद झालेच पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. पुढे म्हणाले की, आज स्त्री शिक्षणावर भर देण्याची गरज आहे. तसेच महिलांना रोजगारासाठी प्रोत्साहित करायला हवेत. स्त्रीयांचा सन्मानासह संरक्षण करण्याची देशातील प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. असेही योगेश पाटील यांनी जिजाऊंच्या जयंतीनिमित्त बोलताना आपल्या परखड भुमिका मांडल्या आहेत.