धरणगाव, प्रतिनिधी । भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेध व्यक्त करत गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करून कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी महात्मा फुले युवा क्रांती मंच यांच्यावतीने आयोजित सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांना केली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील ऐतिहासिक निवासस्थानी अज्ञात समाजकंटकांनी भ्याड हल्ला करून तोडफोड केली. राजगृह हे बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असून या निवासस्थानी त्यांच्या सुमारे ५०,००० पुस्तकांचा संग्रह आहे. संविधान लिहिण्यासाठी बाबासाहेब जिथे बसायचे ती खोली व सर्व दुर्मिळ वस्तू या राजगृहात आहेत. या घटनेमुळे तमाम भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. या हल्ल्याचा तीव्र निषेध करत यामधील गुन्हेगारांच्या त्वरित शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी महात्मा फुले युवा क्रांती मंचचे अध्यक्ष आर. डी. महाजन, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ, धरणगाव नगर परिषदेचे अध्यक्ष निलेश चौधरी, शहराध्यक्ष राजेंद्र महाजन, उपनगराध्यक्ष विलास महाजन, भानुदास विसावे, पी. एम. पाटील, नगरसेवक पप्पू भावे, वासूदेव चौधरी, सुरेश महाजन, मोहन महाजन, नंदू पाटील, संजय चौधरी, वाल्मीक पाटील, व्ही. टी. माळी, नरेंद्र. पाटील. गणेश महाजन, विलास माळी, विजय महाजन, सतीश बोरसे, भारतीय जनता पार्टीचे शिरीष बयस, पुनीलाल महाजन, दिलीप महाजन, कन्हैया रायपूरकर, कांतीलाल महाजन, योगेश माळी, सुनील चौधरी, राजेंद्र महाजन, राष्ट्रीय काँग्रेसचे चंदन पाटील गौरव चव्हाण, नंदलाल माळी, रामचंद्र मळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाजी कंखरे, महात्मा फुले ब्रिगेडचे पी. डी. पाटिल, राजेंद्र महाजन, लक्ष्मण पाटील, आबा वाघ, हेमंत माळी, शिवा महाजन, ललित पाटील उपस्थित होते.