राजकीय पक्ष शेतकर्‍यांना भडकावत आहेत- फडणवीस

 

नागपूर । राजभवनावर काढण्यात आलेल्या मोर्चाला फारसा प्रतिसाद मिळाला नसून राजकीय पक्ष कृषी कायद्यांवरून शेतकर्‍यांना भडकावत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

राजभवनावर शेतकर्‍यांच्या मोर्चात महाविकास आघाडीचे नेते सहभागी होणार आहेत. या आधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात बोलतांना या मोर्चावर टीका केली आहे. महाराष्ट्रात कृषी विधेयक येऊन इतके दिवस झाले कुठलंही आंदोलन झाले नाही, काही पक्ष जाणीवपूर्वक ढोंगबाजी करत आहेत. शेतकर्‍यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, शेतकर्‍यांना चुकीच्या गोष्टी सांगण्यात येत आहेत.

राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी रविवारी हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रमधील शेतकरी मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, शिवसेना नेते पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे सहभागी होणार आहे. या शेतकर्‍यांना भडकविण्याचं काम काही पक्ष करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

फडणवीस पुढे म्हणाले की, जे लोकं या मोर्चाच्या निमित्ताने मंचावर जात आहेत त्यांना माझा सवाल आहे काँग्रेस पक्षाने आपल्या २०१९ च्या जाहीरनाम्यात बाजारसमित्या रद्द करु असं म्हटलं होतं. मग आता काय झालंय, आम्ही तर बाजार समित्या बरखास्त करु असं म्हटलंही नाही.. मग शेतकर्‍यांना भडकवून हे नेते काय साध्य करु पाहत आहेत, असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला.

Protected Content