राजकारणात विकासाची स्पर्धा करावी – आ एकनाथराव खडसे

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अशक्यप्राय वाटणाऱ्या खामखेडा पूल निर्मितीची मी युती शासनाच्या काळात जेव्हा घोषणा केली, तेव्हा माझ्या या विधानाचा विरोधकांनी खरपूस समाचार घेतला, खामखेडा पूल झालाच, तर तळहातावर फोड उगवून दाखवील अशी घोषणा करणाऱ्या आदरणीय स्व. पंढरीभाऊ पाटील यांनी खामखेडा पूल प्रत्यक्षात पूर्ण झाल्यावर माझा सत्कार केला. मी राजकारणात सुरुवातीपासून विकासाची स्पर्धा करण्याचे आवाहन विरोधकांना करीत आलो आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी केले आहे.

रोहिणीताई खडसे यांच्या संकल्पनेतून आयोजित राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या तेहतीसाव्या दिवशी मुक्ताईनगर तालुक्यातील मुंढोळदे, पंचाणे, मेळसांगवे, शेमळदे येथे ग्रामस्थांसमवेत संवाद साधला यावेळी एकनाथराव खडसे बोलत होते.

खडसे पुढे म्हणाले की, आताच्या आमदारांनी शेमळदा -सुलवाडी पूल करून दाखवावा, तो करून दाखवल्यास मी स्वतः त्यांचा जाहीर सत्कार करेल असे आवाहन आ एकनाथराव खडसे यांनी शेमळदा येथील जाहीर सभेत केले. यावेळी त्यांनी राज्यातील सत्ताधारी पक्षाचा समाचार घेतला. सत्ताधाऱ्यांना एकटा नाथाभाऊ नको आहे. सत्तेचा दुरुपयोग करून माझे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी प्रयत्न केला जातोय. काहीतरी, कोणतेही खोट्यानाट्या आरोपाखाली मला अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे.यापूर्वी इतकं खालच्या पातळीवरील गलिच्छ राजकारण कधीही पाहिलं नव्हतं, अशी खंत त्यांनी व्यक्त केली .माझ्या सोबत मतदार संघातील माझ्यावर मनापासून प्रेम करणारा माझा प्रामाणिक कार्यकर्ता आहे,माझा मतदार आहे.जनता जनार्दनाचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत, या आशीर्वादाच्या जोरावर मी सर्वांना पुरून उरेल, “असा विश्वास आ खडसे यांनी व्यक्त केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणी खडसे,माफदा राज्याध्यक्ष विनोद भाऊ तराळ,यात्रा प्रमुख ईश्वरभाऊ रहाणे, निवृत्तीभाऊ पाटील, तालुका अध्यक्ष यु डी पाटील, माजी सभापती सुधाकर पाटील, किशोर चौधरी, वसंतराव पाटील,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पवनराजे पाटील, रामभाऊ पाटील, राष्ट्रवादी युवती काँग्रेस तालुकाध्यक्ष आम्रपाली पाटील, दिपक पाटील,प्रदिप साळुंखे, संदिप देशमुख, विकास पाटील, रविंद्र पाटील, भैय्याभाऊ पाटील, रतीराम पाटील, बाळाभाऊ भालशंकर, विशाल रोटे, जुबेर अली, अयाज पटेल,फारूक जमादार, मुस्ताक मण्यार, वाहब खान, सिद्धार्थ तायडे, योगेश्वर कोळी, भागवत कोळी, गोकुळ कोळी, विकास पाटील, जितेंद्र पाटील, साहेबराव पाटील, श्रीराम पाटील, माणिक पाटील, भागवत कोळी, नंदलाल भोई यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी भैय्यासाहेब रविंद्र पाटील यांनी संवाद यात्रेला सर्वत्र, सर्व स्तरावर ग्रामस्थानकडून मिळत असलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल रोहिणीताईंचे आणि खास यात्रा यशस्वीतेसाठी परिश्रम घेत असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.प्रसंगी राज्यातील आणि केंद्रातील दोन्ही सरकारला जनतेसाठी, जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचे सांगून महागाई, बेरोजगारी,स्वायत्त संस्थांचा गैरवापर,महाराष्ट्राबाहेर जात असलेले प्रकल्प याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. यात्रेत आलेल्या काही समस्या नाथाभाऊंच्या प्रयत्नातून त्वरित निकाली काढत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.आपल्या मतदार संघात गेल्या तीन वर्षांपासून विकास थांबला आहे. फक्त नाथाभाऊची मुलगी आहे म्हणून रोहिणीताईच्या पाठीशी उभे राहू नका, तर भाऊंप्रमाणेच काम करण्याची धमक त्यांच्यामध्ये आहे, म्हणून ताईंच्या पाठीशी उभे रहा कारण आगामी निवडणुकीत रोहिणीताईच भावी आमदार म्हणून विधानसभेत जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी रोहिणीताई यांनी सुद्धा त्यांच्या खास शैलीत संवाद यात्रेचा उद्देश स्पष्ट करून, किरकोळ मतांनी पराभव झाला तरी ज्या 90हजार मतदारांनी मला भरभरून मतदान केले, त्यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी आणि जन सामान्यांसाठी लढायला बळ मिळावे यासाठी आशीर्वाद मागण्यासाठी मी आपल्याकडे आल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी
मुंढोळदे येथिल गजमल पाटील, गोकुळ पाटील, बाळू पाटील, संतोष भालेराव,सुरेश भालेराव, दिलीप कोळी, प्रकाश कोळी, लक्ष्मण पाटील, रघुनाथ भालेराव, मधुकर मराठे, गणेश कोळी, प्रकाश कोळी, पंढरी पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

पंचाणे येथील सरपंच सुधाकर ठाकरे, उपसरपंच चिंधु ठाकरे, श्रीराम पाटील, विकास पाटील,ज्ञानेश्वर पाटील,सोनु पाटील, माणिक पाटील,गणेश ठाकरे,भागवत तायडे,नंदलाल भोई,मुकेश पाटील, शुभम पाटील,योगेश पाटील, निलेश पाटील, पिंटू पाटील, आकाश ठाकरे, तुकाराम तायडे, पवन ठाकरे, ज्ञानेश्वर ठाकरे, विनायक पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

मेळसांगवे येथील गजानन पाटील, रघुनाथ इंगळे, कडू बाभूळकर, संजय पाटील, योगेश कुंभार, संजय भोई, धनराज धनगर, चुडामन पाटील, ज्ञानेश्वर कोळी, रविंद्र पाटील, भास्कर पाटील, विनोद पाटील, रघुनाथ कोळी, किशोर भालशंकर, गौरव बाभूळकर, किरण पाटील, प्रशांत पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

शेमळदे येथील भागवत पाटील, ज्ञानेश्वर पाटील, ज्ञानेश्वर तायडे, बाळू पाटील, श्रीराम पाटील,विनोद पाटील, संजय पाटील,राजेंद्र पाटील, हिरामण भोई, पुंडलिक कोळी, सोपान कोळी, गोपाळ कोळी, दिलीप पाटील, कांतीलाल जाधव, सतिष काशिनाथ पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Protected Content