रस्त्यावर उतरत शिवसेनेचे रस्त्यांसाठी आंदोलन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील रस्त्यांची अत्यंत वाईट दुरवस्था झालेली आहे. महापालिकेला वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष होत आहे. महापालिकेच्या कुंभकर्णी प्रशासनाला जागे करण्यासाठी महापालिकेसमोर शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले.

शिवसेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगावातील रस्त्यांची दुरावस्था व अत्यंत खराब झाली आहे. शिवसेनेतर्फे महापालिका प्रशासनाला रस्त्यांबाबत तक्रार देण्यात आले, आंदोलन करण्यात आले. मात्र प्रशासनाचे याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याने आज शिवसेनेच्यावतीने महापालिकेच्या आवारात प्रतिकात्म कुंभकर्ण आणून ‘महापालिका प्रशासन जागे व्हा !’ असे आंदोलन केले. प्रशासनाने लवकरात लवकर जळगाव शहरातील रस्त्यांची दुरावस्था बदलावी व दुरूस्ती करून चांगले शहर व सुंदर शहर करावे आणि जळगाव शहरातील नागरीकांना होणारा त्रास थांबवावा अन्यथा यानंतर शिवसेनेच्या वतीने मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

या निवेदनावर निलेश पाटील, संजय कोल्हे, नितीन राजपूत, मंगला बारी, दिनेश पाथरिया, नितीन जावळे, ईश्वर नाईक, महेंद्र सोनवणे, नितीन पाटील, युवासेना महानगराध्यक्ष स्वनिल परदेशी, सागर कुटुंबळे, अमित कोतवाल, विजय राठोड, निलू इंगळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/632718774027152/

 

shivsena andolan, jalgaon mahapalika, jalgaon news, jalgaon shivsena, manapa jalgaon, jalgaon rasta, 

Protected Content