रस्त्यात कुत्रे आडवे आल्याने रिक्षाचा अपघात; चालकासह दोन विद्यार्थी जखमी

पहूर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दहावीच्या खासगी क्लाससाठी पहूर येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रिक्षाच्यासमोर कुत्रे आडवे आल्याने रिक्षा पलटी होवून रिक्षाचालकासह दोन विद्यार्थी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी २८ एप्रिल रोजी सकाळी पहूर गावानजीक घडली. जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

 

रिक्षा चालक ईश्वर रंगनाथ हिवरकर (वय-३४) आणि मानसी युवराज बोरसे (वय-१५), प्रतीक संजय पडाळे (वय-१५) सर्व रा. लोंढ्री तालुका जामनेर असे जखमी झालेल्यांची नावे आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, नववीच्या वर्गातून दहावीच्या वर्गात गेलेल्या विद्यार्थ्यांनी बहुर येथे खाजगी क्लास लावलेला आहे. या क्लाससाठी जामनेर तालुक्यातील लोंढ्री गावातील ही काही विद्यार्थ्यांनी क्लास लावल्या असल्यामुळे शुक्रवार २८ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास खाजगी रिक्षाने लोंढ्री गाव येथून पहूर येथे जाण्यासाठी निघाले. रस्त्यात कुत्र्यांचा झुंबड आडवा आल्याने रिक्षा चालकाचा ताबा सुटला. यात रिक्षा पलटी झाल्याने रिक्षाचालक ईश्वर रंगनाथ हिवरकर तर विद्यार्थी प्रतीक संजय पडोळे आणि मानसी युवराज बोरसे असे तीन जण जखमी झाले. त्यांना तातडीने खाजगी वाहनाने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या संदर्भात पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.

Protected Content