रस्ते करा अन्यथा आम्ही भरलेला कर परत करा – श्रीधर चौधरी

जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  मनपा प्रशासन मुलभूत सुविधा देवू शकत नसेल तर आम्ही भरलेला कर आम्हाला परत करा अन्यथा मनपा समोर सोमवारी उपोषण करण्याचा इशारा  शिवाजीनगरातील रहिवाशी श्रीधर चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिला.

 

मागील दहा वर्षापासून जळगाव शहरातील शिवाजीनगर भागात एकही रस्ता महापालिका प्रशासनाने तयार करण्यात आलेला नाही.   परिसरात अस्वच्छता असून वेळेवर पाणीपुरवठा होत नाही या व अशा अनेक समस्या मनपा प्रशासन, लोकप्रतिनीधी सोडवत नसतील तर आम्ही दहा वर्षापासून भरलेला कर आम्हाला परत करा या मागणीसह शिवाजीनगरातील समस्यांबाबत शनिवारी तथा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे माजी जिल्हा सरचिटणीस श्रीधर चौधरी यांनी पत्रकार परिषदेत घेतली होती. यावेळी पुढे, बोलतांना चौधरी म्हणाले, की दर वर्षी  मनपा प्रशासन नागरिकांकडून न चुकता कर घेतात. परंतू नागरिकांना मुलभूत सुविधा शुन्य मिळत आहे. मनपा अधिकारी, कर्मचारी तसेच नगरसेवक यांच्या सहमतीने शिवाजीनगरातील नागरिकांना मुद्दाम त्रास दिला जात आहे. रस्तेे नाही, वेळेवर पाणी नाही, नियमीत सङ्गाई नसल्याने जागोजागी कचर्‍यांचे ढीग त्यामुळे परिसरात रोगराई पसरलेली आहे. त्यामुळे आम्ही दहा वर्षापासून भरलेला कर आम्हाला परत मिळावा यासाठी सोमवारी ३१ ऑक्टोबर रोजी महापालिका इमारतीसमोर सकाळी अकरा वाजता उपोषण केले जाणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी, आयुक्त, पोलिस अधिक्षकांना १४ ऑक्टोबरला निवेदन दिले. परंतू याची कोणीच दखल घेतलेली नाही अशी माहिती चौधरी यांनी दिली आहे.

 

Protected Content