Home धर्म-समाज रस्ता दुरूस्तीचे काम त्वरीत सुरू करा; रिपाइंचे निवेदन अन्यथा आंदोलन करण्याचा...

रस्ता दुरूस्तीचे काम त्वरीत सुरू करा; रिपाइंचे निवेदन अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  अंकलेश्वर ते बुऱ्हाणपूर राज्य महामार्गावरील रस्त्या खड्डेमय झाला असून याची तातडीने दुरूस्ती करावी,  या मागणीचे निवेदन रिपांई (अ)चे युवा जिल्हा सचिव सुपडू संदानशिव यांनी राज्यमार्ग प्राधिकरण कार्यालयाचे उपअभियंता दिग्विजय पाटील यांना दिले आहे. रस्ता दुरूस्ती न केल्यास आंदोलना इशाराही यावेळी दिला आहे.

 

अंकलेश्वर ते बुऱ्हाणपूर रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. मार्गावरून चालवितांना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यावल ते चोपडा रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली आहे.  तरी अंकलेश्वर ते बुऱ्हाणपूर नुतनीकरण करण्यात यावा अशी मागणी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. यावेळी रिपाइंचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Protected Content

Play sound