जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊन सुरू असतांना रस्ता अडवणार्यांवर गुन्हे दाखल होणार असून आक्षेपार्ह पोस्टसाठी व्हाटसअॅप अॅडमीन्सला जबाबदार धरण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी दिला आहे.
लॉकडाऊनच्या काळात सार्वजनिक रस्ता अडवणारे व सोशल मीडियावर धार्मिक, जातीय तेड निर्माण होणारे मेसेज, पोस्ट व्हायरल करणार्यांवर पोलीस प्रशासनाची नजर आहे. जिल्ह्यात बर्याच भागामधील नागरिक हे येण्या-जाण्याचा सार्वजनिक रस्ता स्वतः बंद करत आहे. त्यामुळे सार्वजनिक रस्ते बंद करणार्या नागरिकांविरोधात पोलिस दलाकडून गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. रस्ते बंद करणार्यांची पोलिसांना माहिती देणार्यांची नावे गुपीत ठेवून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील सर्व व्हॉट्सअॅप ग्रुपच्या अॅडमीनने आपल्या ग्रुपवर चुकीची पोस्ट व्हायरल होऊ नये म्हणून ग्रुप स्वत:पुरता नियंत्रित करावा. आपल्या व्हॉट्सअॅपमधील ग्रुपवर ओन्ली अॅडमीन हा पर्याय निवड करावा. कोणत्याही ग्रुपवर अफवा किंवा धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट व्हायरल केल्यास त्या गुन्ह्याबाबत त्या सदस्यांसह ग्रुप अॅडमिनलाही जबाबदार धरण्यात येणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००